जे दुख केव्हातरी संपणार असते तेच दुःख माणूस सहन करू शकतो. ज्या दु:खाला किनारा असतो तेच दु:ख भोगून पार करता येते. ज्या दु:खाची जात ठरवता येत नाही ज्या संकटाचे रूप नावात व्यक्त करता येत नाही तेच जास्त भीषण असते.
प्रत्येक वेळेला रडनार्याचे सांत्वन करता येतेच असे नाही, अर्थात रडणार्याला त्याची जाणीव नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असे तिला वाटते. पण काही काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा जास्त सांत्वन देणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडतो. ज्योतीपेक्षा जास्त समयी जास्त तापत नाही का?
सुख सुख म्हणजे तरी काय? समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस काहीच दु:खी होत नाही. स्व:तला सुखी समजणारी इतर माणसेही सवयीने सुखी झालेली असतात. शेकडा नव्वद टक्के लोकांना जे मिळत ते आपल्यालाही मिळालं आहे ह्या जाणीवेतून ती सुखी होतात.
आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार याची आशा सुटत नाही म्हणून आपण जगतो. उद्या बद्दलची काही न काही स्वप्न अशी असतात म्हणून आज मृत्यूला कवतालाव असे वाटत नाही.
भूतकाळातल झालेल्या अपमानाचे अश्रू भविष्यातल्या पायवाटेवर शिम्पडायचे असतात म्हणजे अनोळखी पायवाट त्या सड्यामुळे परिचयाची होते. नव्याने होणार्या अपमानाची शल्य बोथट होतात.